शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (13:49 IST)

अमेरिका: अटलांटा विमानतळावर चेंगराचेंगरी, बंदूकधारी हल्लेखोर प्रवाशी पळून गेला; तीन जखमी

हार्ट्सफिल्ड-जॅक्सन अटलांटा विमानतळावर प्रवाशाजवळ एक शस्त्र सापडले. चेंगराचेंगरीत तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, दोघांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी विमानतळावर ही घटना घडली जेव्हा चेक पॉइंटवर सर्वांच्या सामानाची झडती घेतली जात होती. यादरम्यान एका व्यक्तीच्या सामानात एक संशयास्पद वस्तू दिसली. त्याच्या तपासणीसाठी सामान वेगळे करताच प्रवाशाने त्याच्या सामानावर उडी मारली आणि पिस्तूल उचलले. सुरक्षा अधिकार्‍यांनी सांगितले की, यावेळी प्रवाशी गोळीबार करत विमानतळाबाहेर पळून गेला. या घटनेने विमानतळावर खळबळ उडाली असून, त्यात तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे बराच वेळ उड्डाणे थांबवण्यात आली होती. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात आली. 
 
अधिकारी सांगतात की संशयित प्रवासी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या व्यक्ती विरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.