शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 4 नोव्हेंबर 2024 (15:36 IST)

व्हिडिओः हिजाबच्या निषेधार्थ युनिव्हर्सिटीत मुलीने काढले कपडे

Iran girl strips at university to protest against hijab restrictions : इराणमध्ये हिजाब आणि ड्रेस कोडबाबत कठोर नियम आहेत. महिलांवर कपड्यांपासून अनेक प्रकारची बंधने आहेत. इस्लामिक आझाद विद्यापीठातील एका मुलीने रस्त्याच्या मधोमध कपडे काढून विरोध केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुलगी कपडे काढून रस्त्यावर फिरत आहे. या कृत्याप्रकरणी तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील कठोर इस्लामिक ड्रेस कोडच्या निषेधार्थ शनिवारी एका महिलेने इराणी विद्यापीठात आपले कपडे काढले. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये इस्लामिक आझाद विद्यापीठाच्या शाखेतील सुरक्षा रक्षक एका अज्ञात महिलेला ताब्यात घेताना दिसत आहेत.
महिला मानसिक दबावामुळे त्रस्त असल्याचे  विद्यापीठाचे प्रवक्ते अमीर महजोब यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले 
 
Edited By - Priya Dixit