शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 25 मार्च 2017 (13:05 IST)

विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाला मंजुरी

सरकारी बँकांचं कर्ज बुडवणाऱ्या विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाला ब्रिटिश सरकारनं मंजुरी दिली आहे. त्यामुळे विजय मल्ल्या यांना भारतात परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारी बँकांचं सुमारे ९ हजार कोटी रुपयांचं कर्ज थकवून परदेशात पलायन करणारा उद्योगपती विजय मल्ल्याचं प्रत्यार्पण करण्याची भारतानं ब्रिटन सरकारला केली होती. फेब्रुवारीत केलेली ही विनंती ब्रिटन सरकारने मान्य केली आहे. ब्रिटन सरकारच्या मंजुरीनंतर याबाबतचा प्रस्ताव वेस्टमिनिस्टर कोर्टापुढे ठेवण्यात आला आहे.परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत शुक्रवारी माहिती देण्यात आली. ब्रिटनचं वेस्टमिनिस्टर जिल्हा कोर्ट आता मल्ल्याच्या नावाने वॉरंट काढेल अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी दिली आहे.