मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 3 ऑक्टोबर 2021 (13:20 IST)

काय सांगता,केवळ कोबी तोडण्याची नोकरी करा, आणि पगार 63 लाख रुपये मिळवा

आपण काम का करतो पैसे कमवायला,कामाच्या मोबदल्यात आपल्याला पैसे मिळावे म्हणून.अशीच एक नौकरी चर्चेत आहे,ज्याबद्दल ऐकल्यानंतर आपण देखील म्हणाल की जर आपल्यालाही अशी नोकरी मिळाली तर त्याचा आनंदच होणार. एक कंपनी अशा व्यक्तीच्या शोधात आहे जी शेतातून कोबी काढू शकेल . ऐकायला आणि वाचायला हे अगदी सोपे वाटत आहे पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या कामासाठी ती कंपनी त्या कर्मचाऱ्याला 5-10 हजार देणार नाही, तर तब्बल 63 लाख रुपयांचे पॅकेज देईल.
होय, कोबी तोडण्याच्या कामासाठी 63 लाख रुपयांचे पॅकेज दिले जात आहे. बातमीनुसार, एका कंपनीने या नोकरीची जाहिरात केली आहे .
 
जाहिरातीत असे म्हटले आहे की वर्षभर शेतातून कोबी आणि ब्रोकोली तोडण्याच्या कामासाठी 30 युरो म्हणजेच भारतीय चलनानुसार 3000 रुपयांपेक्षा अधिक दर तासाला मिळतील. 62400 युरो म्हणजेच 63,11,641 लाख रुपये एका वर्षात या नोकरीसाठी दिले जात आहेत.