शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 28 नोव्हेंबर 2022 (16:30 IST)

2500 नग्न लोक बीचवर जमले... Video कारण जाणून घ्या

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ येत असतात. मात्र अलीकडेच एक व्हिडिओ पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत. समुद्रकिनाऱ्यावर 2500 लोक जमले होते ते पण नग्न अवस्थेत. इतके लोक एकत्र आणि ते नग्न पण का असा प्रश्न पडला असता त्यामागील कारण देखील जाणून घ्या.
 
जनजागृतीसाठी अनेक संदेश देणारे उपक्रम, आंदोलने, रॅली आपण पाहिल्या आहेत. अशाच एका विचित्र उपक्रमाचा व्हिडिओ जगभरात धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये जगाला संदेश देण्यासाठी 2500 लोक न्यूड झाले होते. 20 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर हा आठवडा राष्ट्रीय त्वचा कर्करोग क्रिया सप्ताह म्हणून पाळला जातो. त्वचेच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी हा अनोखा उपक्रम या आठवड्यात राबविण्यात आला होता.
 
सिडनीच्या बोन्डी किनाऱ्यावर 26 नोव्हेंबरच्या सकाळी 2500 नग्न स्त्री-पुरुष जमले होते. हे नग्न स्त्री-पुरुष त्वचेच्या कर्करोगासंदर्भात जागरुकता वाढवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कलाकृतीत सहभागी होण्यासाठी येथे आले होते. 
 
ही संकल्पना अमेरिकन फोटोग्राफर स्पेन्सर ट्यूनिक यांनी तयार केली आहे. या उपक्रमाचा उद्देश ऑस्ट्रेलियातील लोकांना नियमित अंतराने त्वचेच्या कर्करोगाची तपासणी करण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे. या उपक्रमात पुरुषांसह महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
 
जगात त्वचेच्या कर्करोगाचे सर्वात जास्त प्रमाण ऑस्ट्रेलियात आहे, अंशी वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडने माहिती दिली आहे.