एक मेंढी दोन कोटींना विकली गेली, वैशिष्ट्य जाणून घ्या
नुकतेच एका मेंढ्याने सर्वात महागड्या मेंढी विकण्याचा जागतिक विक्रम केला. ही मेंढी 2 कोटी रुपयांना विकली गेली.
एलिट ऑस्ट्रेलियन व्हाईट सिंडिकेटने ही ऑस्ट्रेलियन व्हाईट स्टड मेंढी सुमारे 2 कोटी रुपयांना विकत घेतली गेली. या सिंडिकेटचे 4 सदस्य न्यू साउथ वेल्सचे आहेत. सिंडिकेट सदस्य स्टीव्ह पेड्रिक यांनी याला "एलिट मेंढी" असे संबोधले आहे. स्टीव्ह यांच्यानुसार या मेंढ्याचा समूहातील प्रत्येकजण वापर करेल. या मेंढीच्या आनुवंशिकतेचा उपयोग इतर मेंढ्यांना त्याच प्रकारे मजबूत करण्यासाठी केला जाईल. या मेंढीचा वाढीचा दर खूप जास्त असून ही विशिष्ट मेंढी सर्वात वेगाने वाढते.
मालक ग्रॅहम गिलमोर यांनी म्हटले की त्यांना इतक्या किमतीची अपेक्षा नव्हती. ते म्हणाले की, इतकी महाग मेंढी विकणे हे आश्चर्यकारक आहे. या मेंढीची किंमत ऑस्ट्रेलियातील लोकर आणि मेंढीचे मांस उद्योग किती उंचीवर पोहोचले आहे हे दर्शवित आहे. ऑस्ट्रेलियामध्ये मेंढी कातरणाऱ्यांची संख्या कमी होत तर मांसाची किंमत हळूहळू वाढत आहे.
ऑस्ट्रेलियन पांढरी मेंढी फरचे दाट आवरण नसलेल्या काही प्रकारच्या मेंढ्यांपैकी एक आहे. यांची पैदास मांसासाठी केली जाते. गिलमोर प्रमाणे दाट शरीराच्या फर नसलेल्या ऑस्ट्रेलियन पांढऱ्या मेंढ्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. सेंट्रल न्यू साउथ वेल्स सेलमध्ये मेंढ्या विकल्या जातात. ऑस्ट्रेलियन व्हाईट स्टड प्राण्याने यापूर्वी जगातील सर्वात महागड्या मेंढ्या होण्याचा मान मिळवला होता. 2021 मध्ये एक मेंढी 1.35 कोटी रुपयांना विकली गेली होती.
Edited by: Rupali Barve