गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: माद्रिद , शनिवार, 2 सप्टेंबर 2017 (10:21 IST)

स्पेनमध्ये टोमॅटो महोत्सव!

स्पेनमध्ये वेलेन्सियामध्ये जगातील सर्वात मोठी ‘फूड फाईट’ असलेला ‘टोमेटिना फेस्टिव्हल’ झाला. यामध्ये सुमारे 22 हजार लोक सहभागी झाले. केवळ एका तासात लोकांनी 165 टन टोमॅटो एकमेकांवर फेकून त्यांचा चिखल केला! भारतात टोमॅटो महाग झाले अशी ओरड सुरू आहे तर जगाच्या पाठीवर एका देशात असा टोमॅटोचा चिखलही होत आहे.
 
वेलेन्सियामध्ये छोट्याशा बुनोल शहरात हा महोत्सव 1945 पासून आयोजित केला जात आहे. यंदाच्या महोत्सवासाठी तिथे 27 लाख 46 हजार 764 रुपये किमतीचे टोमॅटो सहा ट्रकमधून शहरात आणण्यात आले. त्यानंतर ते छोट्या वाहनांमधून महोत्सवाचे मुख्य ठिकाण असलेल्या प्लाजा लयाना येथे आणले. या महोत्सवात स्थानिकांबरोबरच जगभरातून आलेले अनेक पर्यटकही सहभागी होत असतात. त्यामध्ये बहुतांशी पर्यटक ब्रिटन, जपान आणि अमेरिकेचे असतात. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी अनेक लोक गॉगल परिधान करतात. या महोत्सवात 700 पोलिस, फायर फायटर्स, पॅरा मेडिकल स्टाफ आणि वॉलेंटियर व्यवस्था ठेवण्यात आली होती. या महोत्सवात खाण्यास योग्य नसलेल्या टोमॅटोंचाच वापर होतो असे सांगून या महोत्सवाचे आयोजकांकडून समर्थन केले जाते.