1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (13:05 IST)

Zombie Virus: आता कोरोनानंतर झोंबी व्हायरसची भीती, रशियातील शास्त्रज्ञांनी 48,500 वर्षे जुन्या झोम्बी व्हायरसला पुन्हा जिवंत केले

corona virus
कोरोनाच्या कहरातून जग अजून पूर्णपणे बाहेर आलेले नाही की आता 'झोम्बी व्हायरस'च्या बातमीने सगळ्यांची झोप उडवली आहे.  फ्रेंच शास्त्रज्ञांनी रशियातील गोठलेल्या तलावाखाली दबलेल्या 48,500 वर्ष जुन्या झोम्बी व्हायरसला जिवंत केले असल्याचे वृत्त आहे. न्यूयॉर्क पोस्टनुसार, फ्रेंच शास्त्रज्ञांना झोम्बी व्हायरसचे पुनरुज्जीवन केल्यानंतर आणखी एक 'साथीचा रोग' होण्याची भीती आहे. 
 
संशोधकांचे म्हणणे आहे की, 'वितळणाऱ्या बर्फातील सेंद्रिय पदार्थाच्या या भागामध्ये पुन्हा उर्जायुक्त सेल्युलर सूक्ष्मजंतू (प्रोकेरियोट्स, युनिसेल्युलर युकेरियोट्स) तसेच अनेक वर्षांपासून सुप्त असलेल्या पण आता पुन्हा जिवंत होऊ शकणारे विषाणू समाविष्ट आहेत. अहवालात पुढे असे म्हटले आहे की जागृत क्रिटर्सची चाचणी घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी सायबेरियन पर्माफ्रॉस्टमधील काही तथाकथित 'झोम्बी व्हायरस' पुनरुज्जीवित केले असावेत, ज्याची पुष्टी होणे अद्याप बाकी आहे. 
 
ही बातमी समोर येताच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी या नवीन आणि कथित धोकादायक झोम्बी व्हायरसबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 
 
सर्वात जुना विषाणू, पंडोराव्हायरस येडोमा 48,500 वर्षांचा होता जे पुनरुज्जीवित आणि साथीच्या रोगाचा प्रसार करू शकते.शास्त्रज्ञांनी शोधून काढले की सर्व 'झोम्बी व्हायरस'मध्ये अधिक संसर्गजन्य होण्याची क्षमता असते आणि त्यामुळे ते 'लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक' असू शकतात. अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. 

Edited By- Priya Dixit