Last Modified: जकार्ता , गुरूवार, 31 जानेवारी 2008 (17:17 IST)
इंडोनेशियात पुन्हा भूकंप
इंडोनेशियातील काही भागाला पुन्हा एकदा भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला आहे. रिक्टर स्केलवर याची तीव्रता 5.9 इतकी नोंदवली गेली.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने इंडोनेशियाला भूकंपाचे धक्के बसत आहेत. यापूर्वी झालेल्या भूकंपाची तीव्रात 6.6 इतकी होती. भूकंपाच्या वृत्ताला सरकारने दुजोरा दिला असलातरी त्सुनामीची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे.