सोमवार, 27 एप्रिल 2026
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By भाषा|
Last Modified: वॉशिंग्टन , बुधवार, 23 जानेवारी 2008 (12:53 IST)

'बुश' खोटारडे...?

'बुश' खोटारडे...?
इराक युद्धापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश आणि त्याच्या अनेक अधिकार्‍यांनी खोटी वक्तव्य केल्याचे उघड झाले आहे.अमेरिकेतील दोन संस्थांनी या संबंधी आपल्या एका अध्यनअहवालात स्पष्ट केले आहे. त्यांच्या या खोट्या वक्तव्याने अमेरिकी जनतेनेही त्यांनी पुकारलेल्या युद्धाला आपले समर्थन दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सेंटर फॉर पब्लिक इंटीग्रीटी या संकेतस्थळाने, हा अहवाल प्रकाशीत केला आहे. या अहवाला नुसार दोन वर्षांच्या कालावधीत, तब्बल ९३५ वेळा खोटी साक्ष देण्यात आली. एवढेच नाही तर, आपल्या भाषणांमधून बुश आणि त्यांच्या अधिकार्‍यांनी ५३२ वेळा खोटी वक्तव्ये केली. यात इराक आणि अलकायदा विषयीच्या काही वक्तव्यांचाही समावेश आहे.