मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. इंटरव्ह्यू टिप्स
Written By
Last Modified: गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (17:02 IST)

Bank Interview साठी काही विशेष प्रश्नावली, तयारी करताना कामास येतील

दरवर्षी बँकांमध्ये भरतीसाठी लिपिक, पीओ आणि एसओ परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा सहसा तीन टप्प्यांमध्ये होतात. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये लेखी चाचणी असते आणि तिसरा टप्पा मुलाखतीचा किंवा व्यक्तिमत्त्व चाचणीचा असतो. मुलाखतीचा टप्पा देखील खूप अवघड असतो. 
 
बँक भरती परीक्षांमध्ये मुलाखत किंवा व्यक्तिमत्त्व चाचणी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. मुलाखतीत यशस्वी झाल्यानंतर बँकेत निवड केली जाते. मुलाखतीत प्रामुख्याने अशे प्रश्न विचारले जातात ज्यामुळे विद्यार्थ्यांची त्वरित उत्तरे देणे, कठीण परिस्थितीला हाताळणे आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन केले जाते. तसेच असे काही प्रश्न असतात ज्या द्वारे विद्यार्थ्यांची बँकिंग आणि कर प्रणाली बद्दलची माहिती असण्याच्या पातळीची चाचणी केली जाते. बऱ्याच वेळा गोंधळात टाकणारे प्रश्न देखील असतात. म्हणून पूर्वी पासून प्रश्नांची माहिती असल्यास तयारीसह गेल्यामुळे यश मिळण्याची दाट शक्यता असते. 
 
चला तर मग जाणून घेऊ या की बँक भरती परीक्षेच्या मुलाखतीमध्ये कोणत्या प्रकाराचे प्रश्न विचारले जातात. 
 
मुलाखत संबंधित प्रश्न - 
* आपण या पूर्वी कधीही मुलाखत दिली आहे ?
* जर मुलाखत दिली गेली असेल तर तिथे विचारलेला कोणता ही प्रश्न सांगा.
* आपण तिथे रुजू का झाला नाही?
* आपली आवड काय आहे ?
* आपण याच बँकेला प्राधान्य का दिले?
 
इतर प्रश्न -
* या शिवाय तांत्रिक, बँकिंग, आर्थिक आणि चालू घडामोडींशी निगडित प्रश्न विचारले जातात.
 
तांत्रिक किंवा फील्डशी निगडित प्रश्न -
* आपली शाखा कोणती आहे?
* आपला आवडीचा विषय कोणता आहे?
 
आपल्या फील्डशी निगडित काही खास प्रश्न -
* बँकिंग/ वित्त संबंधित काही प्रश्न.
 
मुलाखत पॅनलचे काही खास विषय खालील प्रमाणे असतात.
आर बी आय शी संबंधित प्रश्न -
* कार्य/राज्यपाल/मुख्यालय इत्यादी.
* आर्थिक धोरण विषयक प्रश्न.
* बँकांच्या खात्यांचे प्रकार.
* केव्हायसीशी संबंधित प्रश्न.
* आर्थिक योजनेशी संबंधित प्रश्न.