1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2017
  4. IPL 10

IPL 10 : 22 एप्रिल रोजीच्या सामन्यांच्या आयोजनात बदल!

IPL 10
दिल्ली महापालिकेची निवडणूक लक्षात घेऊन यंदाच्या आयपीएलच्या वेळापत्रकात किरकोळ बदल करण्यात आला आहे.
 
दिल्ली डेअरडेव्हिल्स, मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघांच्या 22 एप्रिलच्या सामन्यांच्या आयोजनात हा बदल करण्यात आला आहे.
 
नियोजित वेळापत्रकानुसार 22 एप्रिलला दिल्ली आणि मुंबई संघांमधला सामना दिल्लीत चार वाजता, तर पुणे आणि हैदराबाद संघांमधला सामना पुण्यात आठ वाजता खेळवण्यात येणार आहे.
 
नव्या कार्यक्रमानुसार 22 एप्रिलचा दिल्ली आणि मुंबई संघांमधला सामना मुंबईत रात्री आठ वाजता खेळवण्यात येईल. त्याच दिवशी पुणे आणि हैदराबाद संघांत पुण्यात होणारा सामना हा दुपारी चार वाजता सुरू होईल.
पुढील लेख
IPL10: दिल्ली डेअरडेव्हिल्सला धक्का; जेपी ड्युमिनीची माघार