सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2017
Written By
Last Modified: बंगळुरू , गुरूवार, 18 मे 2017 (08:51 IST)

IPL-10 कोलकाताचा धमाकेदार विजय

आयपीएल-10 चे विजतापद जिंकण्याची हैदराबादच्या स्वप्नांवर आज मध्यरात्री पावसाने पाणी फेरले. नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या कोलकाताच्या संघाने हैदराबादला 20 षटकांच्या अखेरीस 7 बाद 128 धावांवर रोखलं.
 
कोलकातासमोर विजयासाठी 129 धावांचं कमकुवत आव्हान होत. मात्र, पहिल्या इनिंगनंतर बंगळुरूत जोरदार पावसाला सुरूवात झाली आणि सामना थांबला.
 
पावसाच्या व्यत्ययानंतर अखेर सामन्याला पुन्हा सुरुवात झाली. सामना 20 षटकांचा न खेळवता 6 षटकाचा खेळण्याचा निर्णय झाला.
 
कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 6 षटकांत 48 धावांची गरज होती. सुरवातीलाच कोलकात्याचे 3 फलंदाज स्वस्तात माघारी परतले.
 
हैदराबादच्या भुवनेश्वर कुमार आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी एक-एक फलंदाजाला माघारी धाडण्यात यश मिळवल. परंतू कर्णधार गौतम गंभीरच्या निर्णायक फलंदाजीपुढे हैदराबादच्या गोलंदाजांचा टीकाव लागू शकला नाही आणि कोलकाताने सात गडी राखून सामना जिंकला.
 
आता उद्या दि.19 रोजी क्वालिफायर-2 च्या मुकाबल्यात कोलकाताचा सामना मुंबईसोबत होईल.