गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2017
Written By
Last Modified: बंगळूरू , शनिवार, 20 मे 2017 (09:53 IST)

मुंबईची अंतिम फेरीत धडक, जेतेपदासाठी पुणेशी भिडणार

कर्ण शर्माचा बळींचा चौकार आणि कर्णधार रोहित शर्मा व कृणाल पंड्याने चौथ्या गड्यासाठी रचलेल्या अर्धशतकीय भागीदारीच्या बळावर मुंबई इंडियन्सने अंतिम फेरीत धडक मारली. मुंबईकर गोलंदाजांच्या भेदक मार्‍यामुळे कोलकाता नाईट रायडर्सला सर्व बाद १0७ धावा करता आल्या. माफक धावांचे आव्हान मुंबईच्या फलंदाजांनी ६ गडी राखून सहज पार केले. या विजयाच्या बळावर मुंबईने अंतिम फेरीत धडक मारली असून विजेतेपदासाठी रायझिंग पुणे सुपरजायंटशी दोन हातकरावे लागतील.