गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2017
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 22 एप्रिल 2017 (12:49 IST)

युसुफ पठाणचे गेलला चॅलेंज

क्रिकेटच्या टी-20 या लोकप्रिय प्रारुपात एखादी आक्रमक खेळी अथवा चार षटकांचा भेदक मारा सामन्याचे रुपडेच बदलू शकतो. अशा संधीचा जो खेळाडू लाभ उठवतो तो हिरो बनतो. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेजर्स बंगळुरुचा फलंदाज ख्रिस गेल आणि कोलकाता नाईट रायडर्सचा ऑलराऊंडर युसुफ पठाण असेच काहीसे खेळाडू आहेत. बंगळुरुच्या ख्रिस गेलने काल 38 चेंडूत 77 धावांचा पाऊस पाडला. याबरोबरच तो टी-20 दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा जगातील पहिला गोलंदाज बनला. ज्यावेळी गेलची बॅट तळपते त्यावेळी त्याला जगातील कोणताही खेळाडू गोलंदाजीकरावयाला घाबरतो. असे असले तरी कोलकाता नाईट रायडर्सचा युसुफ पठाण त्याला जोरदार टक्कर देत आहे. ही टक्कर आहे 'मॅन ऑफ द मॅच' बनण्याची.