रविवार, 28 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2017
Written By
Last Modified: राजकोट , शुक्रवार, 7 एप्रिल 2017 (23:16 IST)

केकेआरने गुजरातला 10 विकेटने पराभूत केले

kkr wins by 10 wickets
आयपीएलमधील आज सुरू असलेल्या  तिसऱ्या लढतीत गुजरात लायन्सने कोलकाता नाइटरायडर्ससमोर 184 धावांचे आव्हान ठेवले.  कर्णधार सुरेश रैनाने केलेली अर्धशतकी खेळी आणि अखेरच्या षटकात दिनेश  कार्तिकने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर गुजरात लायन्सने 20 षटकात 4 बाद 183 धावा फटकावल्या कोलकाता नाइटरायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर ब्रेंडन मॅक्युलमने गुजरातला आक्रमक सुरुवात करून दिली. पण जेसन रॉय (14), मॅक्युलम (35) आणि आरोन फिंच (15) हे ठरावीक अंतराने बाद झाले. त्यामुळे 11 व्या षटकात गुजरातची अवस्था 3 बाद 92 अशी झाली होती. 
 
मात्र अशा परिस्थितीत कर्णधार सुरेश रैना (नाबाद 68) आणि दिनेश कार्तिक (47) यांनी चौथ्या विकेटसाठी 87 धावा जोडत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.