गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2017
Written By

IPL 10: विराटने आपले तोंड आरशात पाहिले हवे: गावस्कर

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आजच्या घडीला जागतिक क्रिकेटमधला सर्वोत्तम फलंदाज आहे. पण त्याची सध्याची आयपीएलमधील कामगिरी अत्यंत निराशाजनक आहे. विराटच्या कामगिरीवर माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही संताप व्यक्त केला आहे.
 
विराटने आपले तोंड आरशात पाहायला हवे. किंग्ज इलेव्हन पंजाब विरूद्ध कोहली ज्याप्रकारे बाद झाला तो काही चांगला फटका नव्हता असे सामना संपल्यानंतर विश्लेषण करताना गावस्कर म्हणाले. कोहली कर्णधार आहे त्यामुळे त्याने ‍अधिक जबाबदारीने खेळ केला पाहिजे, असे गावस्कर म्हणाले.