सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2017
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 20 एप्रिल 2017 (10:35 IST)

विराटचा 'तो' फोटो झाला व्हायरल

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि गुजरात लायन्स यांच्यात काल झालेल्या सामन्यात रवींद्र जडेजाच्या चाहत्यांना त्याचा वेगळाच लूक पाहायला मिळाला. मात्र हा लूक बंगळूरुचा कर्णधार विराट कोहलीला चांगलाच फनी वाटला असल्याचे दिसत आहे. कारण जडेजाकडे पाहून त्याच्यावर हसत असल्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. यात विराट जडेजाकडे पाहून इशारा करत आहे. दरम्यान, हाच फोटो सध्या सोशलमिडीयावर व्हायरल होत असून जडेजाच्या लूक विषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना दिसत आहेत. मंगळवारी झालेल्या या सामन्यात बंगळूरुने 21 धावांनी बाजी मारली. ख्रिस गेल आणि विराट कोहली यांनी या सामन्यात धमाकेदार खेळी साकारतना यंदाच्या आयपीएलमधील सर्वात मोठी धावसंख्या उभारली.