1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2019
Written By
Last Modified: बुधवार, 27 मार्च 2019 (17:50 IST)

मायकल फेल्प्सने पहिल्यांदा भारतात येऊन घेतला आयपीएलचा मजा

michael phelps
सर्वकालिक महान ओलंपियन्सांपैकी एक मायकल फेल्प्सने मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज दरम्यान आयपीएल सामना पाहुन क्रिकेटचा आनंद घेतला. ओलंपिकमध्ये 23 सुवर्णपदके जिंकणारे फेल्प्स प्रमोशनल प्रोग्रामसाठी दिल्ली आला आहे आणि त्याने संध्याकाळी फिरोज शाह कोटला येथे काही वेळ घालवला.
 
बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, फेल्प्सने कधीही क्रिकेट सामना बघितला नव्हता आणि ही त्याच्यासाठी भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ बघण्याची एक चांगली संधी होती. तो दिल्ली कॅपिटल्सचा पाहुणा म्हणून आला होता, त्याला प्रायोजक माध्यमाकडून आमंत्रित केले गेले होते. अमेरिकेचा हा 33 वर्षीय स्वीमर पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आला आहे. तो सामना सुरू झाल्यानंतर स्टेडियम पोहोचला आणि एक तासानंतर निघून गेला.