बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2019
Written By
Last Modified: शनिवार, 13 एप्रिल 2019 (09:20 IST)

आयपीएलच्या खेळाडूंवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता

मुंबईत खेळण्यात येणाऱ्या आयपीएलच्या सामन्यात खेळाडूंवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून सुरक्षा व्यवस्थेव वाढ करण्यात आली आहे.
 
एटीएसने पकडलेल्या संशयित दहशतवाद्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधार ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतील हॉटेल ट्राइडेंट पासून वानखेडे मैदानापर्यंतच्या परिसराची दशहतवाद्यांनी पाहणी केली आहे, अशी माहिती संशयित दहशतवाद्याकडे करण्यात आलेल्या चौकशीतून पुढे आली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी माक्समॅन कॉम्बॅट वाहनाचा वापर करण्यस सांगितले आहे. यासोबतच खेळाडू थांबणार असलेल्या हॉटेल आणि वानखेडे मैदानावरील सुरक्षेमध्ये वाढ करण्याचे आदेश दिले आहेत.