रविवार, 28 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

डब्याची सोय करा, डबेवाले आता सुट्टीवर जाणार

mumbai dabbawala holiday
मुंबईतले डबेवाले आता सुट्टीवर जाणार आहेत. येत्या १५ एप्रिलपासून ते २० एप्रिलपर्यंत मुंबईत जेवणाचे डबे पोहोचवणारे डबेवाले सहा दिवसांच्या सुट्टीवर चालले आहेत. त्यामुळे डब्बे घेणाऱ्या मुंबईकरांना आधीच आपली सोय करावी लागणार आहे.
 
मुंबईतील डबेवाले हे मुळचे मुळशी, मावळे, खेड, आंबेगाव, जुन्नर, जिल्हा पुणे तर इतर डबेवाले हे अकोला, संगमनेर जिल्हा अहमदनगर या भागातील आहेत. सध्या या जिल्ह्यांमध्ये यात्रेचे दिवस सुरु आहेत. तसेच यात्रेसाठी मुंबईतील डबेवाले आवर्जून जातात. त्यामुळे डबेवाल्यांना यात्रेकरता आपल्या गावी जाता यावे याकरता ते सहा दिवसांच्या सुट्टीवर जात असल्यामुळे जेवणाचे बडे पोहचवण्याची सेवा बंद ठेवली आहे. या सहा दिवसाच्या सुट्टीत महावीर जयंती आणि गुडफ्रायडे या दोन सरकारी सुट्या असल्यामुळे खऱ्या अर्थाने डबेवाले चार दिवस सुट्टी घेणार आहेत.