शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

म्हणून झी वाहिनीच्या कार्यक्रमांच प्रसारण बंद

झी वाहिनीवर आचार संहितेचे सारे नियम धाब्यावर बसवत मालिकेमधून प्रचार केला. यावर निवडणूक आयोगानने कारवाई केली आहे. आज सकाळी झी वाहिनीच्या कार्यक्रमांच प्रसारण 8 ते 10 यावेळेत बंद करण्यात आलं होतं.
 
आचार संहिता लागु असताना अशा प्रकारे प्रचार करणे झी वाहिनीला महागात पडले आहे. निवडणूक आयोगाने या मालिकेच्या निर्मात्यांना नोटीस पाठवली होती. मालिकेच्या निर्मात्यांना २४ तासांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. ‘भाजपा दिवसेंदिवस खालच्या दर्जाची राजनीती करत आहे. पक्षाचा प्रचार करण्यासाठी आता मालिकांचाही वापर केला जात आहे. निवडणूक आयोगाने याकडे लक्ष द्यावं,’ असं ट्विट काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केलं होतं. याविषयी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती.