शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2021
Written By
Last Updated : गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (21:02 IST)

सनरायझर्स हैदराबादचे मोठे नुकसान, तुफानी फलंदाजाचे वडील वारले, आयपीएल 2021 सोडावे लागले

सनरायझर्स हैदराबादला आयपीएल 2021 मध्ये मोठा धक्का बसला आहे. वडिलांचे निधन झाल्यामुळे दमदार फलंदाज शेरफान रदरफोर्डला स्पर्धेच्या मध्यातच सोडावे लागले आहे. यामुळे, शेरफान रदरफोर्डने सनरायझर्स हैदराबादला आयपीएल 2021 मध्ये सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तो IPL 2021 चा बायो बबल सोडून घरी जात आहेत. शेरफान रदरफोर्ड हा वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू आहे आणि प्रथम सनरायझर्स हैदराबाद संघात सामील झाला. त्याने जॉनी बेअरस्टोची जागा घेतली. याआधी तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता.