मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2021
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 16 एप्रिल 2021 (17:25 IST)

चेन्नईची आज पंजाब किंग्जशी लढत

आयपीएलमध्ये शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज आमने-सामने ठाकणार असून, पंजाब किंग्जने या मोसमातील पहिला सामना जिंकला असून चेन्नई सुपर किंग्जला मात्र आपल्या विजयाचे खाते उघडता आले नाही. त्यामुळे सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आपल्या नेतृत्वाखाली कोणती रणनीती आचरणात आणणार याची अटकळ चाहते बांधत असून, अशा परिस्थितीत हा सामना रोमांचक ठरणार असल्याची शक्यताही    
वर्तविण्यात येत आहे.
 
वानखेडे स्टेडियमवर होणार्या या सामन्याच्या पार्श्वभूमीवर नाणेफेकीचा कौल देखील महत्त्वाचा ठरणार आहे. प्रथम गोलंदाजी करणार्या संघाला खेळपट्टीची साथ मिळू शकते. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस आणि धोनी फारशी चमक दाखवू शकले नव्हते.