मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 एप्रिल 2021 (11:20 IST)

Dating App वापरकर्त्यांसाठी चांगली बातमी! लवकरच Facebook आणत आहे व्हिडिओ डेटिंग अॅप, 4 मिनिटात पसंतीचा जोडीदार मिळेल

आपण एखादा साथीदार शोधण्यासाठी अॅपची मदत घेण्याचा विचार करत असाल तर फेसबुक अॅप आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. वास्तविक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आपल्या वापरकर्त्यांसाठी एक खास डेटिंग अॅप आणण्याची तयारी करत आहे. फेसबुकचा हा अॅप व्हिडीओ डेटिंग अॅप असेल. महत्वाचे म्हणजे की या क्षणी हे अॅप टेस्टिंग फेजमध्ये आहे आणि त्याला स्पार्क Sparked असे नाव देण्यात आले आहे. Sparked अॅप वापरकर्त्यांसाठी विनामूल्य असेल. या अॅपमध्ये आपण फेसबुक अकाउंट क्रेडेन्शियल्ससह लॉग इन करू शकाल.
 
फेसबुकचे अॅप Tinderसारख्या डेटिंग अॅप्सपेक्षा खूप वेगळे असेल. Sparked वापरकर्ते टिंडरसारख्या इतर वापरकर्त्यांना स्वीप डायरेक्ट मेसेज करू शकणार नाही. बलकी ते एकमेकांसोबत संबंध बनवण्यासाठी शार्ट व्हिडिओजमध्ये बोलू शकतील. Vergeच्या अहवालानुसार या अॅपमधील पहिल्या व्हिडिओची तारीख चार मिनिटे असेल.
 
इतक्या वेळ बोलण्यात सक्षम असाल व्हिडिओ डेटमध्ये  
Sparked अॅपमधील प्रथम व्हिडिओ डेट चार मिनिटांसाठी असेल. ज्यामध्ये तो स्वतःबद्दल सांगेल. हा व्हिडिओ अन्य वापरकर्त्यांना दर्शविला जाईल. एकदा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर फेसबुक टीम त्यासंदर्भात चौकशी करेल. त्यानंतरच तुम्हाला या डेटिंड ऐपमध्ये प्रवेश मिळेल. पहिल्या डेटनंतर, जर दोन्ही वापरकर्त्यांनी व्हिडिओ पुन्हा डेट करू इच्छित असाल तर ते दुसऱ्या व्हिडिओ डेट व्हिडिओला 10 मिनिटांसाठी शेड्यूल करू शकतात. जर दुसऱ्या डेटला जमले वापरकर्ते इतर प्लॅटफॉर्मवर जसे इन्स्टाग्राम, डायरेक्ट मेसेज किंवा ईमेलवर चॅट करू शकतात.
 
या नियमांचे पालन करावे लागेल 
Sparkedवर साइन अप करण्यापूर्वी वापरकर्त्यांना विशिष्ट नियमांचे पालन करावे लागेल. यामध्ये एकमेकांचा आदर करणे, अॅ्पला सुरक्षित ठिकाण बनविणे यासारख्या नियमांचा समावेश असेल. स्पार्कमध्ये साइन अप करताना Kindness हा शब्द बर्याच वेळा वापरला गेला आहे. तथापि, कंपनीने हे उघड केले नाही की हे अॅप वापरकर्त्यांसाठी कधी आणले जाईल.