गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: मंगळवार, 3 मे 2022 (23:15 IST)

GT vs PBKS IPL 2022: पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा 8 गडी राखून पराभव केला

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL च्या 15 व्या हंगामातील 48 वा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात मुंबईतील DY पाटील स्टेडियमवर खेळला गेला. पंजाब किंग्जने हा सामना जिंकला. पंजाब संघाने IPL पॉइंट टेबलमध्ये नंबर वन गुजरात टायटन्सचा 8 विकेट्सने पराभव केला. 
 
या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, पंजाब किंग्जने गुजरातला सुरुवातीपासूनच आपल्या ताब्यात ठेवले होते. संघाला 20 षटकात 8 गडी गमावून 143 धावा करता आल्या. पंजाबसमोर विजयासाठी 144 धावांचे लक्ष्य होते, जे संघाने 16 षटकांत 2 गडी गमावून पूर्ण केले.