सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 एप्रिल 2022 (17:01 IST)

IPL 2022, KKR vs PBKS सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल, कोलकाता आणि पंजाब सामना कुठे आणि कसा पहायचा ते जाणून घ्या

कोलकाता नाईट रायडर्स संघ पंजाब किंग्जविरुद्ध चांगली फलंदाजी करण्याच्या लक्ष घेऊन  मैदानात उतरणार आहे. कारण संघ त्यांच्या शेवटच्या सामन्यात केवळ 128 धावांत गारद झाला होता. गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले असले तरी संघाला तीन गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. 
 
कोलकाताने त्यांच्या दोनपैकी एक सामना जिंकला आहे तर पंजाबचा संघ पहिला सामना जिंकून सलग दुसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. 
 
आयपीएल 2022 चा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
 
कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील IPL 2022 सामना शुक्रवारी (1 एप्रिल) IST संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल.
 
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील आयपीएल 2022 सामना स्टार स्पोर्ट्स चॅनेल - स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर थेट प्रसारित केला जाईल.
 
डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहू शकता. हॉटस्टारच्या वेबसाइटवर लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर हा सामना आपण थेट पाहू शकाल.