शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 मे 2022 (23:33 IST)

IPL 2022, RR vs CSK : राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा 5 गडी राखून पराभव केला

chennai kings - rajasthan
मुंबई. यशस्वी जैस्वालच्या 59 धावांच्या खेळीनंतर आर अश्विनच्या नाबाद 40 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2022 च्या 68व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा 5 गडी राखून पराभव केला. राजस्थानने चेन्नईवर विजय मिळवत गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने निर्धारित षटकात 6 गडी गमावून 150 धावा केल्या. मोईन अलीने सर्वाधिक 93 धावा केल्या. मोईनची फलंदाजी पाहून चेन्नई मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत होते, मात्र तो बाद झाल्यानंतर चेन्नईचा वेग मंदावला. मोईन व्यतिरिक्त एमएस धोनीने सीएसकेसाठी सर्वाधिक 26 धावा केल्या. डेव्हन कॉनवेने 16 धावा केल्या.