सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: बुधवार, 18 मे 2022 (12:32 IST)

IPL 2022: शेवटच्या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादला धक्का, कर्णधार विल्यमसनने सोडला संघ

kane williamson
IPL 2022 मध्ये मंगळवारी सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला. या विजयासह हैदराबादचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. आता संघाला 22 मे रोजी पंजाब किंग्जविरुद्ध साखळी टप्प्यातील शेवटचा सामना खेळायचा आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. यापूर्वी हैदराबाद संघाला पराभवाचा धक्का बसला आहे. केन विल्यमसनने संघ सोडला असून तो लवकरच आपल्या मायदेशी परतणार आहे. विल्यमसनने हैदराबाद कॅम्प सोडला आणि बायो-बबलमधून बाहेर पडला.
 
सनरायझर्स हैदराबादने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. खरं तर, विल्यमसन दुसऱ्यांदा वडील होणार आहे आणि बायकोसोबत वेळ घालवण्यासाठी बायो-बबलमधून बाहेर पडला आहे. सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले - आमचा कर्णधार विल्यमसन न्यूझीलंडला परतत आहे. त्याच्या कुटुंबात आणखी एक सदस्य येणार आहे. हैदराबाद संघातील प्रत्येक सदस्य विल्यमसन आणि त्याच्या पत्नीला शुभेच्छा देतो.
 
संघाने 13 पैकी सहा सामने जिंकले आहेत. सध्या हैदराबादचा संघ १२ गुणांसह आठव्या स्थानावर आहे. पंजाबविरुद्धचा विजय आणि इतर संघांचा पराभव यामुळे हैदराबादसाठी प्लेऑफचे समीकरण होऊ शकते.पंजाबविरुद्धच्या सामन्यात विल्यमसनच्या अनुपस्थितीचा फटका संघाला नक्कीच बसेल. विल्यमसनच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार किंवा निकोलस पूरन यांच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. भुवनेश्वरने यापूर्वीही हैदराबादचे कर्णधारपद भूषवले आहे.