शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 मे 2022 (23:37 IST)

PBKS vs RCB :पंजाबने बेंगळुरूचा 54 धावांनी पराभव केला

PBKS vs RCB: Punjab beat Bangalore by 54 runsPBKS vs RCB :पंजाबने बेंगळुरूचा 54 धावांनी पराभव केला
आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला. या सामन्यात पंजाबने बेंगळुरूचा 54 धावांनी पराभव केला. 210 धावांच्या धावसंख्येचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ 9 गडी गमावून 155 धावाच करू शकला. पंजाबसाठी या सामन्यात रबाडाने 21 धावांत 3 बळी घेतले. त्यांच्याशिवाय राहुल चहर आणि ऋषी धवननेही 2-2 बळी घेतले. या विजयासह पंजाबने प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. या हंगामातील पंजाब किंग्जचा हा सहावा विजय आहे. 
 
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने नऊ गडी गमावून 209 धावा केल्या. पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टोनने 70 आणि जॉनी बेअरस्टोने 66 धावा केल्या. बंगळुरूकडून हर्षल पटेलने 4 बळी घेतले. हसरंगाने 4 षटकात 15 धावा देत 2 गडी बाद केले. 
 
या विजयासह पंजाब किंग्ज 11 सामन्यांतून 6 विजय आणि 12 गुणांसह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी प्लेऑफचा रस्ता कठीण झाला आहे. 13 सामन्यांतून 7 विजय आणि 14 गुणांसह संघ अजूनही चौथ्या स्थानावर आहे. मात्र इतर संघांनी हा सामना जिंकल्यास बेंगळुरूला प्लेऑफमध्ये स्थान मिळवणे कठीण होऊ शकते.