गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मे 2023 (11:43 IST)

VIDEO : Gautam Gambhir सोबत वादानंतर देव दर्शनासाठी पोहचले Virat - Anushka

irat Kohli-Anushka Sharma visit temple
Virat Anushka Temple Visit सोशल मीडियावर सध्या विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विराट धोतर नेसलेला असून कपाळावर टिळक आणि गळ्यात फुलांचा माळ घातलेला दिसत आहे. त्याचबरोबर अनुष्काच्या कपाळावर टिळक आणि गळ्यात माळ आहे. जे पाहून हे जोडपे दर्शन घेण्यासाठी मंदिरात पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. 1 मे रोजी अनुष्का शर्माचा वाढदिवस होता आणि LSG vs RCB यांच्यात सामनाही झाला होता, ज्यामध्ये विराट आणि गंभीर यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती.
 
मंदिरात पोहचले विराट-अनुष्का
Virat Kohli आणि Anushka Sharma यांची फॅन फॉलोइंग चांगलीच आहे. अशात ते कुठेही गेले की बातमी लगेच व्हायल होते. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विराट-अनुष्काच्या एका मंदिरात दिसत आहेत. 2 मे रोजी हे जोडपे मंदिरात दर्शनासाठी गेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या व्हिडिओमध्ये विरुष्का कोणत्या मंदिरात आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.
 
जसे की माहित आहे 1 मे रोजी लखनौ आणि बंगलोर यांच्यात लो-स्कोरिंग सामना खेळला गेला, जो RCB ने 18 धावांनी जिंकून 2 गुण मिळवले. मात्र या सामन्यातील गदारोळामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. प्रथम विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यात जोरदार बाचाबाची झाली आणि नंतर विराट आणि गौतम गंभीर एकमेकांना भिडले. आता विराट आणि अनुष्काचा ताजा व्हिडिओ गौतम गंभीरसोबतच्या भांडणाशी जोडला जात आहे. यूजर्स वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत.