शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: मंगळवार, 4 एप्रिल 2023 (19:55 IST)

IPL 2023 मध्ये कोरोनाची एन्ट्री

सध्या IPL 2023 सामने सुरु आहे. आज गुजरात टायटन्स चा सामना लखनौशी होणार आहे. सध्या देशात कोरोना ने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. IPL 2023 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून माजी भारतीय सलामी वीर आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांना कोरोनाची लागण लागल्याचे खुद्द चोप्रा यांनी त्यांच्या युट्युब चॅनलवर 
माहिती दिली आहे. आकाश चोप्रा काही दिवस कॉमेंट्री करू शकणार नाही असे देखील ते म्हणाले .  
 
आकाश चोप्रा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये लिहिले आहे, 'व्यत्यय आल्याबद्दल क्षमस्व. कोविडने पुन्हा एकदा तोंड वर काढले आहे. काही दिवस कमेंट बॉक्समध्ये दिसणार नाही. मला कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. मी काही दिवस कॉमेंट्री करू शकणार नाही. 
 
Edited By - Priya Dixit