शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: रविवार, 14 मे 2023 (11:52 IST)

IPL 2023: दिल्ली प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर, जाणून घ्या संपूर्ण गणित

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 16वा हंगाम आता शेवटच्या प्रवासाकडे वाटचाल करत आहे. शनिवारपर्यंत (13 मे) आयपीएल 2023 मध्ये 59 सामने खेळले गेले आहेत आणि सर्व दहा संघांनी किमान 11 सामने खेळले आहेत. आता ग्रुप स्टेजचे केवळ 11 सामने शिल्लक आहेत अशा स्थितीत प्ले ऑफची लढत निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला दिल्ली कॅपिटल्स हा एकमेव संघ आहे. दिल्ली कॅपिटल्सला पंजाब किंग्जविरुद्ध 31 धावांनी पराभव स्वीकारावा लागला, जो चालू मोसमातील त्यांचा आठवा पराभव होता.  आतापर्यंत कोणत्याही संघाला प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करता आलेले नाही. जाणून घ्या संपूर्ण गणित 
 
* गुजरात टायटन्स: गतविजेत्या गुजरात टायटन्सची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे आणि ते प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या जवळ आहेत. मुंबईविरुद्धचा शेवटचा सामना गमावूनही हार्दिक पांड्याचा संघ 12 सामन्यांत 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.  
गुजरातला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. गुजरातला सनरायझर्स हैदराबाद (15मे) आणि आरसीबी (21 मे) यांच्याविरुद्ध सामने खेळायचे आहेत.
 
* चेन्नई सुपर किंग्स: धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने 12 पैकी सात सामने जिंकले आहेत आणि सध्या 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी CSK ला दोनपैकी एक सामना जिंकावा लागेल. चेन्नईचे उर्वरित दोन सामने कोलकाता नाईट रायडर्स (14 मे) आणि दिल्ली कॅपिटल्स (20 मे) विरुद्ध आहेत. 
 
* मुंबई इंडियन्स: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ लयीत आला आहे आणि सध्या 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.प्लेऑफमध्ये सहज पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्सला उर्वरित दोन सामने जिंकणे आवश्यक आहे.मुंबई 16 गुणांसह प्लेऑफमध्येही स्थान मिळवू शकते, परंतु यासाठी त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. मुंबईला लखनौ सुपाक जायंट्स (16 मे) आणि सनरायझर्स हैदराबाद (21 मे) विरुद्ध खेळायचे आहे. 
 
* लखनौ सुपर जायंट्स:  सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 7 विकेटने विजय मिळवल्यानंतर, लखनऊ सुपर जायंट्स चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत. लखनौचे 12 सामन्यांत 13 गुण आहेत आणि त्यांना प्लेऑफमध्ये स्थान पक्के करण्यासाठी उर्वरित दोन सामने जिंकावे लागतील. लखनौ सुपर जायंट्सचा सामना मुंबई इंडियन्स (मे 16) आणि कोलकाता नाइट रायडर्स (मे 20) यांच्याशी होणार आहे. 
 
* राजस्थान रॉयल्स: 2008 च्या चॅम्पियन राजस्थान रॉयल्सचे 12 सामन्यांत समान गुण आहेत आणि ते पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहेत. राजस्थानला आता प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे.यासोबतच राजस्थानलाही इतर निकाल आपल्या बाजूने लागतील अशी आशा बाळगावी लागेल. राजस्थान रॉयल्सला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (14 मे) आणि पंजाब किंग्ज (19 मे) यांच्याविरुद्ध सामने खेळायचे आहेत. 
 
* पंजाब किंग्स: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यानंतर, पंजाब किंग्ज पॉइंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आला आहे. पंजाबचे 12 सामन्यांत 12 गुण आहेत... 
प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता कायम ठेवण्यासाठी पंजाबला उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. पंजाबला दिल्ली कॅपिटल्स (17 मे) आणि राजस्थान रॉयल्स (19 मे) विरुद्ध सामने खेळायचे आहेत. 
 
* रॉयल चॅलेंजर्स बंगलोर:  फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी 11 सामन्यांत 10 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. RCB साठी चिंतेची बाब म्हणजे त्याचा नेट-रनरेट जो सध्या मायनस (-0.345) वर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आरसीबीला उर्वरित तीन सामने जिंकावे लागतील. 14 मे रोजी आरसीबीचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे.  त्यानंतर त्याला पुढील दोन सामने सनरायझर्स हैदराबाद (१८ मे) आणि गुजरात टायटन्स (21 मे) यांच्याविरुद्ध खेळावे लागतील. 
 
* कोलकाता नाइट रायडर्स: राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर केकेआर प्लेऑफमधून बाहेर पडण्याच्या जवळ आहे. KKR चे 12 सामन्यात 10 गुण आहेत आणि ते जास्तीत जास्त 14 गुणांपर्यंत पोहोचू शकतात. अशा स्थितीत सलग दोन विजयांसह त्याला अनेक समीकरणे आपल्या नावे करावी लागणार आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचे उर्वरित दोन सामने चेन्नई सुपर किंग्ज (14 मे) आणि लखनऊ सुपर जायंट्स (20 मे) विरुद्ध आहेत. 
 
* सनरायझर्स हैदराबाद: लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या पराभवानंतर सनरायझर्स हैदराबादची अवस्था बिकट झाली आहे, सनरायझर्सचे 11 सामन्यांतून 8 गुण आहेत आणि ते सध्या 9व्या स्थानावर आहेत. उर्वरित तीन सामने जिंकण्यासोबतच त्याला उर्वरित निकालांवर अवलंबून राहावे लागणार आहे. सनरायझर्स हैदराबादला गुजरात टायटन्स (15 मे), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (18 मे) आणि मुंबई इंडियन्स 21 मे) या बलाढ्य संघांचा सामना करावा लागणार आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit