सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मे 2023 (23:44 IST)

MI vs GT IPL 2023 : मुंबईकडून गुजरातचा 27 धावांनी पराभव

MI vs GT Indian Premier League 2023 : मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 27 धावांनी पराभव करून IPL 2023 मध्ये सातवा विजय नोंदवला. या विजयासह हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 218 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ केवळ 191 धावा करू शकला आणि सामना 27 धावांनी गमावला
 
मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 27 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादवच्या 103 धावांच्या जोरावर 5 बाद 218 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ आठ विकेट्सवर केवळ 191 धावा करू शकला आणि सामना गमावला. रशीद खानने गुजरातसाठी नाबाद 79 धावांची खेळी केली, पण त्याला दुसऱ्या टोकाला साथ मिळाली नाही आणि तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. 
 
या सामन्याच्या पहिल्या डावात मुंबईकडून सूर्यकुमार यादव व्यतिरिक्त रोहित शर्माने 29, इशान किशनने 31 आणि विष्णू विनोदने 30 धावा केल्या. त्याचवेळी गुजरातकडून राशिद खानने चार आणि मोहित शर्माने एक विकेट घेतली. गुजरातकडून राशिद खान व्यतिरिक्त डेव्हिड मिलरने 41 आणि विजय शंकरने 29 धावा केल्या. मुंबईकडून आकाश मधवालने तीन बळी घेतले. पियुष चावला आणि कुमार कार्तिकेयने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
 
राशिद खानने शानदार अर्धशतकी खेळी खेळून आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली.
 
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 5 विकेट गमावत 218 धावा केल्या आहेत. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 103 धावांची खेळी केली. डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत त्याने आपले शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने 11 चौकार आणि सहा षटकार मारले. त्याचे हे पहिलेच आयपीएल शतक आहे. सूर्याशिवाय ईशान किशन, विष्णू विनोद आणि रोहित शर्मा यांनीही मुंबईसाठी उपयुक्त खेळी खेळली. गुजरातकडून राशिद खानने चार आणि मोहित शर्माने एक विकेट घेतली.
 



Edited by - Priya Dixit