शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मार्च 2023 (09:05 IST)

IPL 2023 : गुजरात टायटन्स वि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पहिला सामना

आयपीएल 2023 चा पहिला सामना गतवर्षीचा चॅम्पियन गुजरात टायटन्स आणि चार वेळा विजेतेपद पटकावणारा संघ चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांना आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने करायची आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या स्वतः महेंद्रसिंग धोनीचा मोठा चाहता आहे आणि धोनीकडून तो खूप काही शिकला आहे. अशा परिस्थितीत धोनी आणि हार्दिक यांच्यातील लढत खूपच रोमांचक असेल. दोन्ही संघात काही बदल करण्यात आले असून मिनी लिलावात दोन्ही संघांनी काही चांगले खेळाडू जोडले आहेत. 
 
बेन स्टोक्सच्या आगमनाने चेन्नईचा संघ मजबूत झाला आहे.तर केन विल्यमसन गुजरात संघाला समतोल साधेल.गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना शुक्रवार, 31 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाईल. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल. 
 
चेन्नई सुपर किंग्ज दोन्ही संघातील संभाव्य खेळणारे 11 : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, मोईन अली, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, महेंद्रसिंग धोनी (विकेटकीपर, कर्णधार), ड्वेन प्रिटोरियस, दीपक चहर, सिमरजीत सिंग.
 
गुजरात टायटन्स : शुभमन गिल, केन विल्यमसन, श्रीकर भारत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (क), मॅथ्यू वेड, राहुल तेवतिया, आर साई किशोर, रशीद खान, यश दयाल, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी.
Edited By - Priya Dixit