गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: बुधवार, 5 एप्रिल 2023 (23:59 IST)

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सचा पाच धावांनी पराभव केला

IPL punjab kings
पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव करून IPL 2023 मध्ये सलग दुसरा विजय नोंदवला. गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना197धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ केवळ 192 धावा करू शकला आणि पाच धावांनी सामना गमावला.
 
पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच धावांनी पराभव केला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने 20 षटकांत 4 बाद 197 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानच्या संघाला 20 षटकांत सात गडी गमावून केवळ 192 धावा करता आल्या आणि पाच धावांनी सामना गमवावा लागला. पंजाबकडून शिखर धवनने नाबाद 86 आणि प्रभसिमरन सिंगने 60 धावा केल्या. त्याचवेळी राजस्थानकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 42 धावा केल्या. हेटमायरने 36 आणि ध्रुव जुरेलने 32 धावा केल्या. पंजाब संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. त्याचबरोबर राजस्थानचा हा पहिला पराभव आहे.
 
 Edited By - Priya Dixit