1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वार्ता|
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 26 एप्रिल 2008 (18:00 IST)

हरभजन वादातून पुन्हा वादात

हरभजन वादातून पुन्हा वादात
च वर्षी ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने रेडियोला दिलेल्या एका मुलाखतीत हरभजनसिंगला 'जहरी माणूस' असे म्हटले होते. त्यावरून जगभरातून निषेधाची तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. पण आता आपल्याच देशाच्या श्रीशांतला थप्पड मारल्यानंतर हरभजन पुन्हा एकदा संशयाच्या गर्तेत सापडला आहे.

ऑस्ट्रेलिया दौर्‍यात हरभजनविरोधात एंड्र्यू सायमंड्सने वर्णद्वेषाचा आरोप केला होता. त्यावेळी भारतीय संघासह पूर्ण देश हरभजनच्या मागे ठाम उभा होता. त्यावेळी भारतीय संघ दौरा रद्द करतो की काय अशी परिस्थिती उद्भवली होती. हरभजनवर तीन कसोटी सामन्यांची बंदीही घालण्यात आली होती. पण नंतर त्याला केवळ दंड ठोठावून सोडून देण्यात आले होते. वर्णद्वेषाचा आरोपही मागे घेण्यात आला होता.

पण हरभजनने शुक्रवारी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या श्रीशांतला थप्पड मारून आपल्याविषयी असलेली सारी सहानुभूती गमावली आहे. यापूर्वीच्या त्याच्यासंदर्भातील वादग्रस्त घटना परदेशात घडल्या होत्या. पण आताची घटना मात्र आपल्याच देशात आणि आपल्या घरच्याच प्रेक्षकांसमोर घडली आहे. त्यामुळेच एकेकाळी त्याच्या मागे ठामपणे उभे असलेले भारतीय क्रिकेट नियामक मंडळही खवळले आहे. त्यांनी त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

पंजाब संघाचा कर्णधार युवराज व प्रशिक्षक टॉम मुडी यांनीही हरभजनवर तीव्र टीका केली आहे. या प्रकरणात हरभजन दोषी सापडल्यास त्याला माफ केले जाणार नाही, असा इशारा पंजाब क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आय. एस. बिंद्रा यांनी दिला आहे.