CSK vs SRH : चेन्नई सुपर किंग्ज ने सनरायझर्स हैदराबादचा 78 धावाने पराभव केला
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने त्यांच्या घरच्या मैदानावर एमए चिदंबरम स्टेडियमवर दमदार कामगिरी करत सनरायझर्स हैदराबादचा 78 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. चेन्नईसाठी कर्णधार रुतुराज गायकवाडने 54 चेंडूत 98 धावांची खेळी केली आणि डॅरिल मिशेलसोबत शतकी भागीदारी केली, याच्या जोरावर चेन्नईने 20 षटकात 3 गडी गमावून 212 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने चमकदार कामगिरी करत चार गडी बाद केले आणि हैदराबादचा डाव 18.5 षटकांत 134 धावांवर आटोपला. हैदराबादकडून एडन मार्करामने 26 चेंडूत सर्वाधिक 32 धावा केल्या. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
चेन्नई सुपर किंग्स संघाने आपल्या घरच्या मैदानावर चेपॉकवर 50 पेक्षा जास्त सामने जिंकणारा CSK हा तिसरा संघ बनला आहे. आयपीएलमध्ये कोणत्याही एका ठिकाणी ५० हून अधिक सामने जिंकणारा चेन्नई हा तिसरा संघ ठरला आहे. त्याआधी, मुंबई आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) च्या संघांनी देखील त्यांच्या घरच्या मैदानावर 50 हून अधिक विजयांची नोंद केली आहे.
सीएसकेने हैदराबादवर मोठ्या विजयासह गुणतालिकेत तीन स्थानांची मोठी झेप घेतली आणि पाच विजयांसह 10 गुणांसह गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे, तर हैदराबाद संघाला याचा फटका बसला आहे. सलग दोन पराभव चौथ्या स्थानावर आहे.
गायकवाड, मिचेल आणि शिवम दुबे यांच्या झंझावाती फलंदाजीमुळे CSK पुन्हा एकदा 200 हून अधिक धावा करण्यात यशस्वी ठरला.
Edited By- Priya Dixit