1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2024
Written By
Last Modified: रविवार, 12 मे 2024 (00:22 IST)

GT vs CSK: बीसीसीआय कडून शुभमन गिल ला दिला मोठा झटका,25 टक्के दंड ठोठावण्यात आला

आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 35 धावांनी पराभव केला..बीसीसीआयने गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलला मोठा झटका दिला आहे. 
 
नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या सामन्यादरम्यान स्लो ओव्हर रेट राखल्याबद्दल शुभमन गिलला त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
बीसीसीआय आणि आयपीएलने दंडाची पुष्टी करणारे एक निवेदन जारी केले,

आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत हा संघाचा हंगामातील दुसरा गुन्हा होता, जो स्लो ओव्हर रेटच्या उल्लंघनाशी संबंधित आहे. त्यामुळे या उल्लंघनाचे गांभीर्य लक्षात घेऊन गिल यांना 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 
 
आयपीएल नियमांनुसार, प्रभावशाली खेळाडूंसह प्लेइंग इलेव्हनमधील उर्वरित सदस्यांना वैयक्तिक 6 लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या 25 टक्के दंडाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघाने पुन्हा एकदा या नियमाचे उल्लंघन केल्यास गिलवर एका सामन्याची बंदी घालण्यात येईल.

या सामन्यातील पराभवामुळे त्याच्या संघाला गुणतालिकेत निव्वळ धावगतीने पराभव पत्करावा लागला आहे.या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रुतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 
या सामन्यात शुभमनने 55 चेंडूत 104 धावांची तर साई सुदर्शनने 51 चेंडूत 103 धावांची शानदार खेळी केली. 
 
Edited by - Priya Dixit