सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2024
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मे 2024 (23:49 IST)

CSK vs GT : गुजरात कडून चेन्नईचा 35 धावांनी पराभव

CSK vs GT
IPL च्या 17 व्या हंगामातील 59 वा लीग सामना गुजरात आणि चेन्नई यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने चेन्नईला 232 धावांचे लक्ष्य दिले होते.
गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करून प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या. गुजरातचा 12 सामन्यांमधला हा पाचवा विजय असून गुणतालिकेत तो आठव्या स्थानावर आहे. सीएसकेला आता बाद फेरी गाठण्यासाठी त्यांचे दोन्ही सामने जिंकावे लागतील
 
वेगवान गोलंदाज मोहित शर्माच्या तीन विकेट्सच्या जोरावर गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 35 धावांनी पराभव करत प्लेऑफच्या शर्यतीत स्वत:ला कायम ठेवले. 
गुजरातने प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या शतकी खेळीच्या जोरावर 20 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 231 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केल्यामुळे चेन्नईचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 196 धावाच करू शकला.
 
गुजरातकडून कर्णधार शुभमन गिलने 104 धावा केल्या तर साई सुदर्शनने 103 धावांची शानदार खेळी केली. चेन्नईकडून तुषार देशपांडेने गोलंदाजीत 2 बळी घेतले.
चेन्नईकडून फलंदाजी करताना मोईन अली आणि डॅरिल मिशेल यांनी अर्धशतकी खेळी खेळली मात्र त्यांना संघाला विजयापर्यंत नेण्यात यश आले नाही. गुजरातकडून मोहित शर्माने गोलंदाजीत 3 बळी घेतले, तर राशिद खाननेही 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या.

Edited by - Priya Dixit