GT vs KKR : IPL मधून बाहेर पडणारा गुजरात तिसरा संघ ठरला, सामना पावसामुळे रद्द  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  IPL 2024 च्या 63 व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना कोलकाता नाइट रायडर्सशी झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार होता. मात्र खराब हवामानामुळे सामना रद्द करावा लागला. या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही.
				  													
						
																							
									  
	 
	अहमदाबादमध्ये मुसळधार पावसामुळे आयपीएल 2024 चा 63 वा सामना रद्द करण्यात आला आहे. पावसाने गुजरात टायटन्सच्या आशा धुळीस मिळवल्या असून हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आयपीएलमधील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा गुजरात हा तिसरा संघ ठरला आहे. याआधी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जही बाहेर गेले आहेत. आजचा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे दोन्ही संघाला प्रत्येकी 1 -1 गुण मिळाला आहे.  गुजरातचे सध्या 13 सामन्यांत 11 गुण आहेत आणि संघाचा पुढील सामना सनरायझर्स हैदराबादशी आहे. गुजरात संघाने तो सामना जिंकला तरी संघ जास्तीत जास्त 13 गुणांपर्यंत पोहोचू शकेल.
				  				  
	 
	सध्याच्या गुणतालिकेत, आधीच चार संघांचे 14 किंवा त्याहून अधिक गुण आहेत. अशा परिस्थितीत जीटी संघ बाहेर आहे. कोलकाता संघ आधीच प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे.राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे स्पर्धेतील संघ आहेत.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	सामना रद्द झाल्यानंतर गुजरातच्या खेळाडूंनी लॅप ऑफ ऑनरचे प्रदर्शन केले. त्यांनी मैदानात फिरून चाहत्यांचे आभार मानले 
				  																								
											
									  
	 
	Edited by - Priya Dixit