गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2024
Written By
Last Modified: सोमवार, 13 मे 2024 (23:21 IST)

IPL 2024: राजस्थान रॉयल्सचा हा खेळाडू प्लेऑफपूर्वी मायदेशी परतला

राजस्थान रॉयल्सचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या जवळ आहे, मात्र त्याआधीच संघाला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानचा स्टार सलामीवीर फलंदाज जोस बटलर इंग्लंडला परतला असून चालू हंगामातील संघाच्या उर्वरित सामन्यांसाठी तो उपलब्ध होणार नाही.

इंग्लंडला T20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे, त्यातील पहिला सामना 22 मे रोजी हेडिंग्ले येथे खेळवला जाईल.टी-२० विश्वचषकात बटलर इंग्लंडची धुरा सांभाळणार असल्याची माहिती आहे. 
जस्थानने हा व्हिडिओ पोस्ट करत 'मिस यू जोस भाई' असे कॅप्शन लिहिले आहे. चेपॉक येथे रविवारी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात बटलर सहभागी होता आणि 25 चेंडूत 21 धावा करून बाद झाला.
 
राजस्थानसाठी बटलरचे जाणे हा मोठा धक्का आहे. बटलरने या मोसमात 11 सामन्यात 140.78 च्या स्ट्राइक रेटने 359 धावा केल्या, ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. बटलरच्या अनुपस्थितीत टॉम कोहलर कॅडमोर यशस्वी जैस्वालसोबत आघाडीवर फलंदाजी करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
राजस्थान संघ सध्या 12 सामन्यांत 8 विजयांसह 16 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
 
Edited by - Priya Dixit