सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2024
Written By
Last Modified: बुधवार, 24 एप्रिल 2024 (18:26 IST)

IPL 2024: 56 चेंडूत शतक झळकावून रुतुराज गायकवाडने इतिहास रचला

Rituraj Gaikwad
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रुतुराज गायकवाडने लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध शानदार फलंदाजी करताना आपले शतक झळकावले. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत रुतुराज गायकवाडने ही कामगिरी केली आहे.
 
ऋतुराज गायकवाडने अवघ्या 56 चेंडूत शतक झळकावले. कर्णधार रुतुराजने 56 चेंडूत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावून चेन्नईला 200 च्या पुढे नेले.
 
 ऋतुराज गायकवाडने कर्णधारपदाची धुरा सांभाळताना अवघ्या 60 चेंडूत 108 धावांची नाबाद खेळी केली. या काळात त्याच्या बॅटमधून 11 चौकार आणि तीन षटकारही आले. ऋतुराज गायकवाडपूर्वी भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालनेही शतक झळकावले होते. राजस्थानकडून खेळताना, जयस्वालने 22 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला.
 
शतकी खेळीसोबतच ऋतुराज गायकवाडने एक खास विक्रमही आपल्या नावावर केला आहे. चेन्नईचे नेतृत्व करताना शतक झळकावण्यात यश मिळवणारा गायकवाड हा चेन्नई सुपर किंग्जचा पहिला कर्णधार ठरला आहे.
 
Edited By- Priya Dixit