सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2024
Written By
Last Modified: रविवार, 19 मे 2024 (14:43 IST)

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

SRH vs PBKS
IPL 2024 चा 69 वा सामना पंजाब आणि हैदराबाद यांच्यात रविवार, 19 मे रोजी दराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता होणार आहे. नाणेफेक दुपारी 3 वाजता होईल. 
 
आत्मविश्वासाने भरलेला सनरायझर्स हैदराबाद संघ रविवारी येथे साखळी टप्प्यातील त्यांच्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जशी सामना करताना गुणतालिकेत अव्वल दोनमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करेल.
 
आयपीएलच्या गेल्या तीन हंगामात गुणतालिकेत तळाला असलेल्या सनरायझर्स संघाने यंदाच्या हंगामात आपल्या अति-आक्रमक फलंदाजीच्या दृष्टिकोनातून आणि उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून ओळख निर्माण केली.संघाने अंतिम चारमध्ये आपले स्थान निश्चित केले. सनरायझर्स सध्या 13 सामन्यांतून 15 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.
सनरायझर्सला शेवटच्या सहा सामन्यांपैकी केवळ दोनच सामने जिंकता आले. तीन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले, तर एक सामना पावसामुळे वाहून गेला.
 
दोन्ही संघाचे सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा जबरदस्त लयीत आहे. 
 
पंजाबला विजयासह बाहेर पडायचे असून यष्टीरक्षक-फलंदाज जितेश शर्मा हंगामातील त्यांच्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचे नेतृत्व करे.
 
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11  
 
सनरायझर्स हैदराबाद: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, पॅट कमिन्स (कर्णधार) , भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे.
 
पंजाब किंग्स : प्रभसिमरन सिंग, अर्थव तायडे, रिले रुसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (कर्णधार आणि यष्टिरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर, नॅथन एलिस, अर्शदीप सिंग. 
 
Edited by - Priya Dixit