बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

एअरटेलचा ग्राहकांना मोठी भेट, कॉल दर 75 टक्क्यांपर्यंत कमी

दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी बांगलादेश आणि नेपाळसाठी आयएसडी कॉल दर 75 टक्क्यांपर्यंत कमी केली आहे. कंपनीच्या ग्राहकांना आता कॉल दरात कपात केल्यावर विशेष रिचार्जची गरज नाही.
 
एअरटेलने एका वक्तव्यात म्हटले आहे की आता बांगलादेशासाठी कॉल दर मात्र 2.99 रुपए प्रति मिनिट असेल, पूर्वी ही दर 12 रुपए प्रति मिनिट होती. हे 75 टक्के कपात दर्शवत असून नेपाळसाठी कॉल दर 7.99 रुपये प्रति मिनिट असेल, पूर्वी 13 रुपए मिनिट होती. हे सुमारे 40 टक्के कपात दर्शवत आहे.
 
कंपनीने दावा केला की सध्या एअरटेलच्या प्रीपेड ग्राहकांसाठी उपलब्ध आयएसडी कॉलची ही दर उद्योगात सर्वात कमी आहे आणि बांगलादेश आणि नेपाळमध्ये आपल्या मित्र व नातेवाइकांना कॉल करण्यासाठी आता वेगळ्याने  विशेष रिचार्जची गरज देखील नाही.
 
एअरटेलची भारतात ग्राहक संख्या 28 कोटीहून अधिक आहे, तसेच दूरसंचार नियामक ट्रायच्या नियमांनुसार जानेवारी शेवटी त्यांच्या मोबाइल ग्राहकांची संख्या सुमारे 34 कोटी होती.