शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मार्च 2019 (08:23 IST)

मेसेज किती वेळा फॉरवर्ड झाला आता हे पण कळणार

व्हॉट्स अॅप आणखी दोन नवे फिचर घेऊन येत आहे. ‘Forwarding Info’आणि ‘Frequently Forwarded’हे दोन नवे फिचर्स लवकरच येणार आहेत. या दोन नव्या फिचरमुळे व्हॉट्सॲपवर एखादा मेसेज किती वेळा फॉरवर्ड झाला आहे हे कळणार आहे. ‘Forwarding Info’हे फिचर मेसेज इन्फो सेक्शनमध्ये उपलब्ध होणार, याद्वारे मेसेज किती लोकांना फॉरवर्ड झाला हे कळणार, या फिचरचा लाभ घ्यायचा असेल तर संबंधित मेसेज स्वतः पाठवलेला असणे गरजेचे आहे. एखादा मेसेज चार पेक्षा जास्त युजर्सना मेसेज फॉरवर्ड केल्यास त्याला ‘Frequently Forwarded’टॅग असणार, पण या टॅगसहित असलेल्या मेसेजना फॉरवर्ड इन्फो फीचर उपलब्ध नसणार आहे.