शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: रविवार, 9 सप्टेंबर 2018 (00:44 IST)

अ‍ॅपलच्या सर्वात मोठ्या इव्हेंटमध्ये लॉन्च होणार आयफोनसह अनेक गॅजेट

लवकरच नवा आयफोन अ‍ॅपल लॉन्च करणार असून 12 सप्टेंबर रोजी कॅलिफोर्नियातील क्यूपरटीनोमधील अ‍ॅपल पार्कच्या स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये अ‍ॅपलचे नवे आयफोन लॉन्च होतील. या इव्हेंटमध्ये फोनशिवाय आणखी काही गॅजेटही लॉन्च केले जाणार असून त्यात अ‍ॅपल वॉच 4, अ‍ॅपल एअर पॉवर आणि पॉड 2 यांचा समावेश आहे. कंपनीचे सीईओ टी कुक यांच्या हस्ते लॉन्चिंग होण्याची शक्यता आहे. यावेळी अ‍ॅपल तीन आयफोन लॉन्च करणार आहे. 6.5 इंच, 5.8 इंच आणि 6.1 इंच या आकाराची स्क्रीन असणार्‍या या आयफोन्सचे फीचर्सही दमदार असतील. शिवाय 6.5 इंच आकाराची स्क्रीन असणार्‍या आयफोनची किंमत अेरिकेत एक हजार डॉलर म्हणजेच भारतात जवळपास 90 हजार रुपये असेल, असेही वृत्त आहे. 12 सप्टेंबरला अ‍ॅपल स्मार्टवॉच 4 लॉन्च होण्याची शक्यता आहे. दमदार बॅटरी बॅकअप आणि चांगल्या परर्फार्मन्ससह ही स्मार्टवॉच दोन साईजमध्ये असतील. एक 38 एमएम आणि दुसरी 42 एमएम अशी साईज असण्याचा अंदाज आहे. याध्ये चार चिपसेट असतील.
 
कनेक्टिव्हिटीसाठी एलटीई आणि वायफाय सुविधा दिली जाण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी या डिव्हाइसचा लूक लॉन्च करण्यात आला होता. त्यामुळे यावेळी हे नवे डिव्हाइस लॉन्च केले जाण्याची अपेक्षा आहे. अ‍ॅपल पॉड 2 चे वायरलेस इयरफोन लॉन्च होण्याची शक्यता आहे. हेडिव्हाइस वॉटर रेजिस्टेंट असेल