मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 21 डिसेंबर 2020 (16:50 IST)

BSNL ने 300 रुपयांपेक्षा कमी किमतीचा 70 GB डेटा प्लॅन सुरू केला, Work From Home करणाऱ्यांसाठी उपयुक्त

सरकारी टेलिकॉम कंपनी (BSNL) ने वर्क फ्रॉम होम करणाऱ्या आपल्या ग्राहकांसाठी एक खास प्री-पेड योजना सुरू केली आहे. या प्लॅन मध्ये बीएसएनएल 70 जीबी डेटा देत आहे. ही योजना बघितल्यावर आपण नक्कीच म्हणाल की परवडणाऱ्या या डेटा प्लॅन देण्याच्या बाबतीत कोणतीही खासगी कंपनी बीएसएनएलला स्पर्धा देऊ शकत नाही. चला तर मग जाणून घेऊ या योजने बद्दलची माहिती. इथे सांगू इच्छितो की बीएसएनएलची ही योजना खास त्यांच्या साठी आहे जे लोक घरी बसून काम करीत आहे. 
 
वर्क फ्रॉम होम साठी च्या या प्लॅन ची किंमत 251 रुपये ठेवण्यात आली आहे. या प्लॅन मध्ये एकूण 70 जीबीचा डेटा मिळेल आणि या प्लॅनची वैधता 28 दिवसाची असेल. पण या प्लॅन मध्ये आपल्याला कॉलिंग किंवा एसएमएस सारखी सुविधा मिळणार नाही. Airtel, Jio, आणि Vodafone Idea, सारख्या कंपनीला स्पर्धा देण्यासाठी BSNL ने वर्क फ्रॉम होम साठी तीन डेटा प्लॅन फक्त 56 रुपये, 151 रुपये आणि 251 रुपयांचा डेटा प्लॅन आणला आहे. 
 
बीएसएनएल च्या 151 रुपयांच्या प्लॅन मध्ये 40 जीबी डेटा मिळतो. बीएसएनएल कडे 151 रुपयांची STV देखील आहे या मध्ये 40 जीबी डेटा मिळतो. या प्लॅन ची वैधता देखील 28 दिवसांची आहे. हे एक डेटा प्लॅन आहे. ह्या महिन्याच्या सुरुवातीला बीएसएनएल ने STV सह झिंग म्युझिक अ‍ॅपचे फ्री सबस्क्रिप्शन देणे सुरू केले.
 
फ्री सिम देत आहे BSNL -सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल आपल्या ग्राहकांना आनंद देण्यासाठी फ्री मध्ये सिम कार्ड देत आहे. सध्या बीएसएनएलचे सिमकार्ड 20 रुपयाचे मिळत आहे पण कंपनी सध्या प्रमोशन च्या ऑफर च्या नावाने मोफत सिम कार्ड देत आहे.BSNL चे हे ऑफर फक्त 15 दिवसांसाठी आहे. बीएसएनएल च्या या ऑफरची सुरुवात 17 डिसेंबर 2020 पासून सुरू झाली आहे. तर या ऑफर चा लाभ घेण्याची शेवटची तारीख 1 जानेवारी 2021 आहे. ही ऑफर सर्व ठिकाणी आहे.