कीबोर्डची विंडोज Key अत्यंत उपयुक्त, जाणून घ्या वैशिष्टये

Last Modified शनिवार, 19 डिसेंबर 2020 (13:10 IST)
एक काळ असा होता जेव्हा कॉम्प्युटरच्या माऊसचा शोध लागला नव्हता. कीबोर्डच्या साहाय्यानेच कॉम्प्युटर चालत असे. काळ बदलला आणि माउस आला. कीबोर्ड महत्त्वाचा होता पण फारसा नाही. पण विश्वास ठेवा की कीबोर्ड अद्याप एक अतिशय उपयुक्त गोष्ट आहे, विशेषतः जेव्हा आपण जलद काम करू इच्छिता.
आपल्याला खात्री नसल्यास एखाद्या व्यावसायिक कॉम्प्युटर चालविणाऱ्या व्यक्तीला भेटा, नंतर आपल्याला माऊसचा वापर कमी झालेला दिसून येईल. कोणता ही तज्ज्ञ कीबोर्डच्या शॉर्ट की चा वापर अधिक करेल आणि त्यामागे सोपे तर्क आहे.

जर आपण काहीही टाईप करीत असाल तर आपले हात कीबोर्ड वर असतात आणि हातांना तिथून माउसवर घेऊन जावे लागतं. कीबोर्ड वरून ते काम करून आपण वेळ वाचवू शकता. थोड्या प्रमाणात काम असेल तर आपण वेळ वाचवता पण काम जास्त प्रमाणात असल्यास तर वेळ आणि गती दोन्ही बघावं लागत. उदाहरणार्थ, जेव्हा आपण कंट्रोल सी (कॉपी) आणि कंट्रोल वी (पेस्ट) दाबून वापर करता तरी ही आपल्याकडे माऊसने वापर करण्याचा पर्याय आहे. पण की बोर्डाने काम करण्याचा आनंदच वेगळा आहे. स्पीड देखील मिळते.

की बोर्डचीचे अनंत महत्त्व आहे म्हणून आज आम्ही सांगत आहोत आपल्याला विन की ची माहिती म्हणजे आपल्या की बोर्ड मध्ये असलेल्या विंडोज बटणाची माहिती. प्रत्येक कॉम्प्युटरच्या सर्वात खालील बाजूस असलेल्या स्पेस बटणाच्या जवळ विन की असते. या की चा वापर सामान्यतः स्टार्टमेन्यू उघडण्यासाठी केला जातो. पण ह्याचा वापर अधिक आहे.

चला तर मग जाणून घेऊ या अशा काही युक्त्या जे आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरतील.
* विंडोज सह अंकाचा वापर -
आपल्या टास्कबार मध्ये बरेच प्रोग्रॅम असतात. ज्यांना उघडण्यासाठी आपल्याला माऊसची गरज पडते. आपल्याला हे प्रोग्रॅम माऊस शिवाय उघडायचे असल्यास विंडोजकी दाबून कीबोर्ड मध्ये दिलेले वरील कोणते ही अंक दाबायचे आहे. टास्क बार मध्ये ठेवलेले ते प्रोग्रॅम जे आपण ठेवले आहे. एक-एक करून उघडतील. जसे की विंडोज की दाबून आपण 1 दाबता तर टास्कबार मध्ये 1 अंकावर कॅलक्युलेटर आयकन आहे तर कॅलक्युलेटर उघडेल. 2 अंकावर क्रोम ब्राउझर आहे. तर विंडोज आणि 2 दाबल्यावर क्रोम ब्राउझर उघडेल. अशा प्रकारे जे नंबर त्या टास्क बार वर आहे ते उघडेल.

* सक्रिय विंडोला नियंत्रित करा -
विंडोजच्या की सह हे खूप सोपं आहे. जर आपण माउसच्या शिवाय एखाद्या प्रोग्रॅमला मिनिमाइझ किंवा मॅक्सिमाईझ करू इच्छिता, तर विंडोज की दाबून एरोज (लेफ्ट,राईट,अप,डाऊन) वापरा. विंडोज दाबून डाऊन एरो करता तर विंडो रिस्टोर डाऊन होईल. विंडोज आणि अप की चा वापर केल्यास रिस्टोर अप होईल, लेफ्ट की चा वापर केल्यास त्याची स्थिती डावी कडे सेट केली जाईल. आपण माऊस विना हे करू शकता. एकदा प्रयत्न करा.
* विंडोज डी वापरून थेट डेस्कटॉपवर जा -
कल्पना करा की आपण बरेच विंडोज आणि प्रोग्रॅम उघडले आहेत आपण जितके अधिक सॉफ्टवेअर किंवा ब्राउझर उघडून ठेवाल, त्यांना मिनिमाइझ करून डेस्कटॉप वर पोहोचण्यासाठी तितकाच वेळ लागेल. या साठी आपण विंडोज डी वापराल तर थेट डेस्कटॉप वर पोहोचाल. नंतर टास्कबार मधून कोणतीही एक विंडो उघडू शकता आणि त्यामध्ये काम करू शकता. हा अतिशय महत्त्वाचा शॉर्टकट आहे. विंडोज 8 आणि वरील ऑपरेटिंग सिस्टम मध्ये डाऊन उजव्या कोपऱ्यात माउस हालविताना हे ऑपरेशन केले जाते, पण इथे आपण कीबोर्ड बद्दल बोलत आहो तर विंडोज इज द बेस्ट!
* विंडोज सह ई चा वापर -
या मुळे आपण आपल्या माय कॉम्प्युटर मध्ये थेट जाऊ शकता.आपण कॉम्प्युटर मध्ये काम करताना सर्व सॉफ्टवेअर उघडता, पण आपल्याला फाइल एक्सप्लोरर मध्ये जाण्याची गरज असल्यास थेट विंडोज ई वापरा. आपल्यासमोर माय कॉम्प्युटरचे पर्याय उघडेल, आपण कोणत्याही ड्राइव्ह मध्ये किंवा फोल्डरमध्ये जाऊन आपल्याला आवश्यक असलेली फाइल उघडू शकता.

* विंडोज सह पी -
आपल्याला आपल्या प्रकल्पाला किंवा प्रोजेक्टला कोणत्याही स्क्रीनवर कनेक्ट करण्याची परवानगी विन की आणि पी एकत्र करून करता येत. हे अधिकृत वापरकर्त्यांसाठी किंवा ऑफिशिअल यूजर्स साठी फायदेशीर आहे.या मुळे आपला लॅपटॉप कोणत्याही मोठ्या स्क्रीनशी सहजपणे कनेक्ट होतो,किंवा एखाद्या प्रोजेक्टरशी देखील कनेक्ट होतो. या साठी आपल्याला विंडोज आणि पी बटण प्रेस करावयाचे आहे.
* विंडोज आणि आर बटण-
हे आपल्याला रन मोड उघडण्यात आणि रन मोड उघडल्यावर कोणत्याही प्रोग्रॅम मध्ये सहजपणे उडी मारण्याची परवानगी देते. आपण कमांड प्रॉम्प्ट देखील उघडू शकता. तसेच कॉम्प्युटरच्या सर्व ड्राइव्ह फॉर्मेट करू शकता.

* विंडोज प्लस आणि मायनस आयकन -
हे शॉर्टकट आपल्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनला लहान किंवा मोठा करतो. बऱ्याच वेळा आपल्याला काही गोष्टींना बघण्यासाठी स्क्रीनला लहान किंवा मोठं करावं लागत. या साठी विंडोज आणि प्लसचे आयकन दाबा आणि सहजपणे आपली स्क्रीन मोठी होईल. तसेच विंडोज आणि मायनस चे आयकन आपल्या स्क्रीन ला सामान्य करतो.
* विंडोज एक्स -
हे आपल्याला कॉम्प्युटरच्या इंटरनल मॅनेजमेंट मध्ये शिरकाव करू देत. ते कंट्रोल पॅनल असो किंवा टास्क मॅनेजर असो किंवा नेटवर्क कनेक्शन असो किंवा डिस्क मॅनेजमेंट असो डिवाइस मॅनेजर पासून पॉवर ऑप्शन आणि मोबिलिटी सेंटर सर्व काही आपल्याला इथेच मिळेल. या साठी आपल्याला फक्त विंडोज आणि एक्स दाबावे लागेल.
* विंडोज सह एल चा वापर -
हे आपल्या स्क्रीन ला लॉक करत. बऱ्याच वेळा असे होत की आपण कॉम्प्युटरमध्ये काम करत आहात आणि आपल्याला त्वरितच उठून जावे लागते. आपल्याकडे यूजरला लॉगआउट किंवा शटडाऊन करण्याचा वेळ देखील नसतो. अशा परिस्थितीत आपण यूजरला लॉक करू शकता म्हणजे विंडोज की सह एल दाबून आपले कॉम्प्युटर लॉगिन स्क्रीन वर जाईल आणि पासवर्ड दिल्या शिवाय आपल्या कॉम्प्युटरच्या डेस्कटॉप वर उघडलेल्या गोष्टी कोणालाही दिसणार नाही. हे खरोखर उपयुक्त कमांड आहे.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

कोरोना नियंत्रणासाठी केंद्राकडून पथकं येणार

कोरोना नियंत्रणासाठी केंद्राकडून पथकं येणार
राज्यात जवळपास पाच महिन्यानंतर २४ तासांच्या अवधीत १० हजारांपेक्षा करोनाचे रुग्ण आढळून आले ...

मालेगावात माजी आमदाराने घेतली जाहीर सभा, गुन्हा दाखल

मालेगावात माजी आमदाराने घेतली जाहीर सभा, गुन्हा दाखल
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जाहीर सभा घेणे आणि सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई असताना

.खासदार प्रज्ञासिंह ठाकूर कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

.खासदार प्रज्ञासिंह ठाकूर कोकिलाबेन रुग्णालयात दाखल
भोपाळच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांना श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने मुंबई येथे ...

नागपुरमध्ये कोरोनावर नियंत्रणासाठी १४ मार्चपर्यंत लॉकडाऊन ...

नागपुरमध्ये कोरोनावर नियंत्रणासाठी  १४ मार्चपर्यंत लॉकडाऊन कायम
नागपुरमध्ये कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने १४ मार्चपर्यंत लॉकडाऊन कायम ...

आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबातील 12 जणांना कोरोना

आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबातील 12 जणांना कोरोना
राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या ...