संबंधित माहिती
- BSNL ने 300 रुपयांपेक्षा कमी किमतीचा 70 GB डेटा प्लॅन सुरू केला, Work From Home करणाऱ्यांसाठी उपयुक्त
- धमाकेदार ऑफर: BSNL रिचार्चवर ४ टक्क्यांची सुट आणि प्रत्येक कॉलवर कॅशबॅक
- WhatsApp चा वापर बंद करणार 28 टक्के युजर्स
- YouTube मध्ये व्हिडिओ मोमेंट्सला कॅप्चर करणे आणि शेअर करण्याची सुविधा सुरू
- Signal App या प्रकारे वापरा
BSNL ने आपला वार्षिक प्लान पुन्हा अपडेट केला
सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड ने आपला १९९९ रुपयांचा वार्षिक प्लान अपडेट केला असून डेटा बेनिफट कमी केले आहे. BSNLच्या १९९९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा मिळत होता. परंतु, आता १ फेब्रुवारीपासून या प्लानमध्ये केवळ २ जीबी डेटा मिळू शकणार आहे.
BSNL चा १९९९ रुपयांचा वार्षिक प्लान
BSNL च्या या प्लानमध्ये आता ३ जीबी ऐवजी २ जीबी डेटा रोज मिळणार आहे. या प्लानची वैधता आधी इतकीच ३६५ दिवसांची राहणार आहे. प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, लोकल-एसटीडी कॉलची सुविधा मिळणार आहे. या प्लानमध्ये रोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे.
या प्लानमध्ये ग्राहकांना आता इरोस नाउचे अनलिमिटेड कॉन्टेंन्टचा फायदा मिळेल. हा फायदा पूर्ण ३६५ दिवसांसाठी असेल. तसेच ६० दिवसांसाठी लोकधून कॉन्टेंट फ्री मिळणार आहे.
BSNL ने पीव्ही १९९९ साठी मल्टिपल रिचार्जची सुविधा १ फेब्रुवारी पासून परत घेण्याची घोषणा केली आहे. आता १९९९ रुपयांच्या प्लानला रिचार्ज केल्यास ग्राहकांना १ फेब्रुवारी पासून ३६५ दिवसांची वैधता मिळणार आहे.
